विषाणू

Jump to navigation Jump to search

विषाणू हा एक अत्यंत सूक्ष्मदर्शी सजीव असून तो इतर सजीव पेशींना संसर्ग करतो. संरक्षक असे प्रथिनांचे कवच व त्यामध्ये जनूकिय घटक अशी सर्वसाधारण विषाणूची मूलभूत रचना असते. प्रथिनांच्या कवचाला कॅप्सिड (capsid) असे म्हणतात. या कॅप्सिडच्या आधारावर विषाणूंसारख्या कणांचे प्रायॉन्स (prions) व व्हायरॉइड्स (viroids) असे वर्गिकरण करतात.

विषाणूंचा अभ्यास करणाऱ्या शाखेला विषाणूशास्त्र म्हणतात तर या शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तींना विषाणूशास्त्रज्ञ म्हणतात. विषाणू हे पेशीमधील परजीवींप्रमाणे आहेत कारण की ते त्यांच्याप्रमाणे पेशीबाहेर प्रजनन करू शकत नाहीत. परंतू ते पेशीमधील परजीवींप्रमाणे पूर्णपणे सजीवही नाहीत. ते प्राणी, वनस्पती तसेच जीवाणू(bacteria) यांच्यासह जवळपास सर्व सजीवांना संसर्ग करू शकतात. जे विषाणू जीवाणूंना संसर्ग करतात त्यांना बॅक्टेरियोफेग (bacteriophage) असे म्हणतात. विषाणू हे सजीव आहेत कि नाहीत हे विवादास्पद आहे. बरेच विषाणूशास्त्रज्ञ त्यांना सजीव मानत नाहीत कारण कि ते सजीवांच्या व्याख्येच्या सर्व कसोट्यांवर उतरत नाहीत. त्याशिवाय विषाणूंना पेशीभित्तीकाही नसते तसेच ते स्वतः चयापचय प्रक्रियाहि करत नाहीत. जे त्यांना सजीव समजतात त्यांच्याकरीता ते थियोडोर श्वान ने मांडलेल्या पेशी सिद्धांताला (Cell Theory) अपवाद आहेत कारण कि विषाणू हे पेशींचे बनलेले नसतात.

शोध

प्रथमतः तंबाखूच्या झाडावर आढळला

विषाणूंची उत्पत्ती

आधुनिक विषाणूंची उत्पत्ती कशी झाली हे अजून पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही त्त्याचबरोबर कोणत्याही एका पद्धतीस सर्व विषाणूंच्या उत्पत्तीस गृहित धरता येत नाही. विषाणू नीटपणे जीवाष्मीकृतही होत नाहीत. रेण्वीय पद्धती (Molecular Techniques) याच त्यांच्या उगमापर्यंत जाण्यासाठी सर्वांत उपयुक्त आहेत. सध्या त्यांच्या उगमाबद्दल दोन मुख्य सिद्धांत आहेत.

विषाणूंचे वर्गीकरण

वनस्पती विषाणू प्राणीमधील विषाणू बॅक्टरीओफेजेस मायकोव्हारसेस

रचना

याला Procariotic व Ucariotic हि म्हणने अवघड आहे

प्रजनन

सजीवत्वावरील वाद-विवाद

विषाणूंमुळे होणाग

The article is a derivative under the Creative Commons Attribution-ShareAlike License. A link to the original article can be found here and attribution parties here. By using this site, you agree to the Terms of Use. Gpedia Ⓡ is a registered trademark of the Cyberajah Pty Ltd.