हॅरी ट्रुमन

Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg
हॅरी एस. ट्रुमन
हॅरी ट्रुमन


सही हॅरी ट्रुमनयांची सही

हॅरी एस. ट्रुमन (मे ८, १८८४ - डिसेंबर २६, १९७२) हा अमेरिकेचे ३३ वे राष्ट्राध्यक्ष होते. ट्रुमन हे इ.स. १९४५ ते इ.स. १९५३ पर्यंत राष्ट्राध्यक्षपदावर होते.

परिचय

राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी ते शेतकरी आणि व्यापारी होते. इ.स. १९२० साली त्यांनी राजकारणात प्रवेश केला.डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार म्हणून सर्वप्रथम इ.स. १९३४ मध्ये सिनेटवर निवडून गेले. राष्ट्राध्यक्ष होण्याआधी ते फ्रँकलिन डिलानो रूझवेल्टच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या काळात इ.स. १९४४ मध्ये उपराष्ट्राध्यक्ष झाले व रूझवेल्टच्या मृत्यूनंतर इ.स. १९४५ साली आपोआप राष्ट्राध्यक्षपदावर आले.

कामगिरी

जपानवर अणुबाँब टाकण्याचा निर्णय यांनीच घेतला होता. साम्यवादाच्या प्रसाराच्या विरोधात इ.स. १९५० मध्ये कोरियामध्ये अमेरिकी सैन्य पाठवले. सोव्हियत रशिया व अमेरिकेतील शीतयुद्धाचा प्रारंभ हॅरी ट्रुमन यांच्या काळातच झाला.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
The article is a derivative under the Creative Commons Attribution-ShareAlike License. A link to the original article can be found here and attribution parties here. By using this site, you agree to the Terms of Use. Gpedia Ⓡ is a registered trademark of the Cyberajah Pty Ltd.